आशिष देशमुख यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

0

नवी दिल्ली : भाजपाचे विदर्भातील काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज बुधवारी काँग्रेस पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. काँग्रेस मुख्यालयात ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.पक्षप्रवेश करण्याअगोदर त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. खासदार नाना पटोले यांच्यानंतर आशिष देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे भाजपाला विदर्भात खूप मोठा धक्का बसला आहे.

2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीलाच आशिष देशमुख यांनी ई-मेलच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला होता. राजीनामा दिल्यानंतर वर्ध्यामध्ये काँग्रेसच्या जाहीरसभेत व्यासपीठावर आशिष देशमुख यांनी हजेरी लावल्याने त्यांचा काँग्रेस प्रवेश नक्की मानला जात होता. आशिष देशमुख यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची मंचावर जाऊन भेट घेतली होती. 3 ऑक्टोबर रोजी त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेत त्यांच्याकडे राजीनामा सोपवला होता.