आशिष शेलार यांचा भुजबळांच्या मनिलॉन्ड्रिंगशी थेट संबंध

0

मुंबई- मुंबई भारतीय जनता पार्चीचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या भागीदारांचे महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी छगन भुजबळ यांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या प्रीती मेनन शर्मा यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत केला.

आशिष शेलार यांचे हात भ्रष्टाराचारामध्ये बरबटलेले असून त्यांच्याविरोधात सीबीआय चौकशी करण्याची धमक पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार का, असा सवाल त्यांनी केला. शेलार यांचा भागीदार बालदी याचे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील छगन भुजबळ यांच्या कंपन्यांसोबत संबंध असून बालदी व शेलार हे भागीदार असल्यामुळे या प्रकरणातील सत्य बाहेर येण्याची गरज आहे. कुख्यात गॅंगस्टर दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार रियाज भाटी हा थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत दिसतो. या प्रकरणाचीही चौकशी होण्याची गरज आहे, से त्या म्हणाल्या.

शेलार यांच्या विरोधात कारवाई करावी. त्यांना विधिमंडळातून निलंबित करण्याची मागणी मेनन यांनी केली. सर्वेश्वर या बोगस कंपनीच्या माध्यमातून शेलार यांना १४ कोटी रूपये कसे मिळाले? त्या कंपनीने १८ कोटी रूपयांची मालमत्ता कशी खरेदी केली? शेलार यांच्या कंपनीला विनासायास १८ कोटी रूपयांचे कर्ज मिळत असेल तर शेतकऱ्यांना कर्ज का दिले जात नाही, असा सवालही त्यांनी केला. बाबा सिद्दीकी यांच्या विरोधात झालेली कारवाई योग्य आहे. मात्र तशी कारवाई शेलारांविरोधात का होत नाही, असेही त्या म्हणाल्या.

शिळया कढीला ऊत – आशिष शेलार
मेनन यांनी आज केलेले आरोप जुनेच आहेत. त्या,चा त्याावेळी मी सविस्त र खुलासा केलेला आहे. सर्वेश्वार आणि रिध्दीा या दोन कंपन्याा माझ्या असल्याचा आरोप करण्यालत आला आहे. माझा आता या कंपन्यां शी कोणताही संबंध नाही. मी राजीनामा दिल्यााची कागदपत्रे संबंधित यंत्रणेला सादर केली आहेत. अन्यब कपंन्यांची व व्यीक्तीं्ची जी नावे माझ्याशी जोडली जात आहेत ती खोडसाळपणे जोडली जात आहेत. माझी कुणाशीही भागीदारी नाही आणि मी कुठल्या ही कंपनीत संचालक मंडळावर नाही. त्याीमुळे त्याय कंपन्यांवमधील अन्यय कोणा व्यलक्तीकचे अन्यड कुणाशी असलेल्या् व्यमवहाराशी माझा संबध नाही. भुजबळ यांच्याशी संबंधित कंपन्या , व्य्क्तींशशी माझा प्रत्य क्ष वा अप्रत्यनक्ष कोणताही संबंध नाही. त्याकमुळे हे आरोप माझी बदनामी करणारे आहेत. रियाज भाटी हा राष्ट्रीवादीचा कार्यकर्ता असल्या्चे त्याकने जाहीरपणे सांगितले. तो एका क्लयबचा मेंबर असल्या्ने मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मतदार आहे. त्यािचे माझ्यासह अन्य सर्वपक्षीय नेत्यांरसोबत फोटो आहेत. वानखेडे स्टे.डियम व बिकेसीतील क्लाबबाबत करण्यात आरोपही बिनबुडाचे आहेत. त्यायवेळी मी एमसीएचा अध्यनक्ष अथवा व्यावस्था पकीय कार्यकारणीचा सदस्यही नव्ह.तो, असेही शेलार यांनी सांगितले.