चोपडा । कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आशिष सचदेव याने केंद्रीय प्रवेश पात्रता परीक्षेत (नीट) घवघवीत यश मिळविले असून त्याला 496 गुण मिळाले आहे. बायोलॉजी (जीवशास्त्र) विषयात 255, केमिस्ट्रीत (रसायनशास्त्र)134 गुण प्राप्त केले आहे. आशिष ने चोपडा शहरात राहूनच तयारी केली. आशिषचे पालक इलेक्ट्रीक साहित्य दुकान चालवतात. सुरुवातीपासून नियमीत 7 ते 8 तास अभ्यास व सुक्ष्म नियोजनासह शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश मिळाल्याचे त्याने सांगितले. भविष्यात वैद्यकीय शिक्षण घेऊन रुग्णसेवा करण्याचा व्यक्त केला. त्याला डॉ.सागर धनगर व कुटूंबियांचे मार्गदर्शन मिळाले.