आशीर्वाद फाऊंडेशनतर्फे अनाथ मुलांना खाऊवाटप

0
तळेगाव :तळेगाव दाभाडे येथे आशीर्वाद फाऊंडेशनतर्फे अनाथ मुलांना गुरुवर्य मनोजजी जैन महाराज यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 14) स्वा. वि. दा. सावरकर गुरुकुल येथे झाला. याप्रसंगी मावळ विचार मंचचे सदस्य व गुरुकुलचे अधीक्षक दादा शिरोडकर तसेच आशीर्वाद फौंडेशनचे संजय दाभाडे, संदीप खानेकर, सदाशिव माने, शंकर रागमहाले, सागर कार्लेकर, रमाकांत कंट्रोल्लू ,सुविद्याताई (माँ विदेही) शिंदे, श्‍वेता दाभाडे व वैरागी काकु सारिकाताई कशालीकर उपस्थित होते. गुरुवर्य मनोजजी जैन यांनी मुलांशी संवाद साधला.