आशेचा किरण: कोरोना रुग्णवाढीचा आकडा घसरला
नवी दिल्ली – करोनाचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न सुरु असताना परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या तिन हजाराच्या वर तर भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या १० हजाराच्या पुढे गेली आहे. देशभरात ३९२ मृत्यूंची नोंद झाली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्र व दिल्लीतील करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी गेल्या २४ तासांत नवीन रुग्णांच्या संख्येत घट नोंदवली गेल्याने आशेचा किरण दिसला आहे. मुंबईत करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये बुधवारी ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. दिल्लीत बुधवारी फक्त १७ नवे रुग्ण समोर आले असून, जी एप्रिल महिन्यातील कोणत्याही दिवसातील सर्वात कमी आकडेवारी आहे.
बुधवारी नवीन प्रकरणे समोर आली असली तरी केवळ ८६६ नवीन रुग्ण देशात आढळून आले होते. त्यापूर्वीचा दिवस मंगळवारपेक्षा ही आकडेवारी सुमारे २५ टक्क्यांनी कमी आहे. या आठवड्यात नवीन प्रकरणांची सर्वात कमी संख्यासुद्धा आहे. सोमवारी देशात कोरोना विषाणूचे १२००हून अधिक नवीन रुग्ण आढळले होते. मंगळवारीही सुमारे ११०० नवीन प्रकरणे नोंदली गेली होती. देशातील कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसणार्या महाराष्ट्रातही सुधारणा होतांना दिसत आहे. बुधवारी महाराष्ट्रात एकूण २३२ नवीन रुग्ण आढळून आले. गेल्या ६ दिवसांतील हे सर्वात कमी आकडेवारी असून, मंगळवारच्या तुलनेत ३४ टक्के कमी आली आहे. पालिकेने गेल्या तीन दिवसांपासून टेस्टिंगचे मापदंड बदलले आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. दिल्लीतही ही संख्या कमी झाली आहे. अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार निजामुद्दीन मरकजच्या लोकांना वेळीच हद्दपार केल्याने दिल्लीतील नवीन प्रकरणे कमी आली आहे. लोकांमध्ये शून्य पॉझिटिव्ह असल्याचे म्हटले जाऊ शकते. येथे एकूण १५७८ प्रकरणांपैकी १०८० म्हणजे ६८ टक्के प्रकरणे तबलिगींशी संबंधित होती.