आश्रमशाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू

0

मुंबई । राज्यात 1075 आश्रमशाळा आहेत. यापैकी 529 शासकीय आणि 546 खाजगी आश्रमशाळा आहेत. यापैकी खासगी आणि शासकीय मिळून 149 आश्रमशाळेत सीसीटीव्ही बसविण्यात येत असून उर्वरित शाळामध्येही जिथे आवश्यकता असतील त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरु असल्याची माहिती आदीवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी दिली.

दिवसेंदिवस शालेय विद्यार्थीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून या अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व आश्रम शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मागणी विधानसभेत भाजपच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित केली. तर भाजपच्या मनिषा चौधरी यांनी याबाबत उपप्रश्न उपस्थित केला. त्यास उत्तर देताना मंत्री सवरा यांनी वरील उत्तर दिले.

आदिवासी विभागाकडून चालविण्यात येणार्‍या आश्रमशाळांमधील व्यवस्थेबाबत जिल्हाधिकार्‍यांच्या आणि आदिवासी विभागाच्या अधिकार्‍यांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने केलेल्या सूचना व शिफारसींची अमंलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शालेय विद्यार्थींनीबाबत कोणताही अनुसूचित प्रकार होवू नये याची दक्षता म्हणून विधिमंडळातील महिला आमदार सदस्यांच्या समितीने सुचविलेल्या शिफारसींचे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी अमरावती जिल्ह्यातील धारणी आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत ज्या संस्थांना मंजूरी दिली आहे. त्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक चौकशीत निदर्शनास आले असून या प्रकरणाची चौकशी करुन संबंधित अधिकार्‍यांना निलंबित केली जाणार.