आश्रमशाळाच्या मुख्याध्यापकास लाच घेताना रंगेहात पकडले!

0
जळगाव : धरणगाव तालुक्यातील चांदसर शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी तक्रारदार यांचे पगार बील व फरकाचे बील तयार करून मंजुरीला पाठविण्यासाठी 400 रूपयांची लाच मागितली होती. शुक्रवारी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुख्याध्यापकांवर कारवाई केली.
तक्रारदार यांचे पगार बील व फरकाचे बील तयार करून मंजुरीसाठी पाठविण्याच्या मोबदल्यात चांदसर शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक ईश्‍वर रामदास महाले वय-55 यांनी 400 रूपयांची मागणी केली होती. दि.11 रोजी मागणी केल्यानंतर तक्रारदार यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
सापळा रचून केली कारवाई
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाल ठाकूर यांच्या पथकातील निरीक्षक निलेश लोधी व कर्मचार्‍यांनी शुक्रवारी दुपारी सापळा रचून मुख्याध्यापक ईश्‍वर देसले यांच्यावर कारवाई केली आहे.