चाळीसगाव । तालुक्यातील कोंगानगर वाघले तांडा येथील प्राथमिक आश्रम शाळेने महिलेला सन 2000 पासून स्वयंपाकी पदावर रीतसर नियुक्ती पत्र दिलेले असताना त्या महिलेला आज पावेतो मान्यता मिळाली नाही व पगार मिळाला नाही वारंवार मागणी करून व पाठपुरावा करून देखील न्याय मिळत नसल्याने वाघले ता चाळीसगाव येथील या महिलेने त्यांचे अपंग पती व भारतीय समाज सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओंकार जाधव यांचे सह 1 मे महाराष्ट्र व कामगार दिनापासून चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी म्हणजे 4 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समाज कल्याण विभाागाचे सहाय्यक आयुक्त खुशाल गायकवाड, समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, तालुका समन्वयक अनिल पगारे, शिक्षक श्री राठोड, नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांच्या उपस्थितील लिंबूपाणी देवून उपोषण सोडविले.
उपोषण सुरु करण्यापूर्वी अनेक ठिकाणी मारल्या चकरा
आमरण उपोषण सुरु करण्यापूर्वी अर्जदार बिजाबाई पुंडलिक राठोड (रा. वाघले पो. हातले ता चाळीसगाव) यांनी भारतीय समाज सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओंकार आबा जाधव यांच्या लेटरपॅडवर तहसीलदार चाळीसगाव यांना अर्ज दिला होता. त्यांना कोंगानगर प्राथमिक आश्रम शाळा (वाघले तांडा ता. चाळीसगाव) येथे रीतसर स्वयंपाकी पदावर 2 जुलै 2012 रोजी नियुक्ती पत्र मिळाले होते तेव्हा पासून त्या काम करीत आहेत मात्र त्यांना अद्याप पावेतो त्या पदावर मान्यता मिळाली नाही व पगार देखील मिळाला नाही याबाबा त्यांनी संबंधित शासकीय अधिकारी, संबंधित विभागाचे मंत्री याना पाठपुरावा केला मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. त्यांनी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, समाज कल्याण जळगाव विभागाचे सह आयुक्त योगेश पाटील, नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त के.एन.गवळे, विजाभज पुणे सह संचालक आयुक्त यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकार्यांना पत्र व्यवहार व पाठपुरावा करून त्यांच्या पदास मान्यता देऊन कायम करावे व आज पर्यंतचा पगार मिळणे बाबत पाठपुरावा केल्याचे म्हंटले आहे तसेच प्रस्तावास पत्र व्यवहार करूनही त्यांचे अपंग पती, मुलांचा व कुटुंबीयांचा काही एक विचार न करता साधे पत्रांचे उत्तर देखील दिले नाही व विचारपूस देखील केली नाही म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी जीवन कसे जगावे.
पगार नाही, उत्पन्न चे साधन नाही, 1 हेक्टर जमीन होती ती विकून आज पावेतो उदरनिर्वाह केला आहे म्हणून आत्महत्या करावी असे वाटते मात्र भारतीय समाज सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओंकार जाधव यांनी आम्हाला आत्महत्या करू नका, शासन दरबारी न्याय हक्कासाठी लढा द्या असे सांगून आम्ही रीतसर मार्गाने पती पत्नी 1 मे 2017 रोजी तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता व उपोषण दरम्यान आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्यास शासन आणि प्रशासनच जबाबदार राहील असा इशारा दिला होता. त्या नुसार दोघे पती पत्नी व त्यांचे सोबत भारतीय समाज सेवा संघाचे ओंकार जाधव देखील 1 मे 2017 पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते.
काही मागण्या पुर्ण करून सोडविले उपोषर्ण
आज 4 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समाज कल्याण विभाागाचे सहाय्यक आयुक्त खुशाल गायकवाड, समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, तालुका समन्वयक अनिल पगारे, शिक्षक श्री राठोड, नायब तहसीलदार विशाल सोनवणे, अपंग संस्थेच्या मिनाक्षी निकम, भारतीय समाज सेवा संघाचे आबा ओंकार वाघ यांनी येवून चर्चा करून म्हणाले की, दीड वर्षांपासून या आश्रम शाळेवर प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहोत. दीड वर्ष पर्यंतचे मानधन पुर्ण मानधन मिळणार, तसेच त्यानंतर ही संस्था ज्यांच्या ताब्यात जाईल त्यावेळी कायम करण्याचा विषय आल्यास प्राधान्याने तूमचा विचार होईल. असे सांगितल्यानंतर सहाय्यक आयुक्त खुशाल गायकवाड यांच्याहस्ते लिंबूपाणी देवून उपोषण सोडविले.