आश्रमशाळेतील रोजंदारी कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ

0

नवापुर । शासकीय आश्रम शाळेत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तासिका पद्धतीने प्रशिक्षित व अप्रशिक्षित मानधनात राज्य सरकारने वाढ केली आहे. राज्यातील तीन हजार कर्मचार्‍यांना लाभ मिळणार आहे. सदर नवीन दर 1 जुन 2017 पासून लागू होणार आहे. मानधनात वाढ करण्यासाठी रोजंदारी संघर्ष संघटनेच्या प्रयत्नानंतर यश मिळाले आहे.अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष रितेश ठाकूर यांनी दिली.

3 हजार कर्मचार्‍यांना होईल लाभ
आदिवासी विकास विभागांर्फत असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तासिका तत्वावर अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात प्रकल्प स्तरावरून प्रशिक्षित व अप्रशिक्षित शिक्षक नेमले जातात. आश्रमशाळेत अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या रोजंदारी,तासिका कर्मचार्‍यांना अतिशय अत्यल्प दरात तासिका पद्धतीने काम करावे लागते. मानधनात वाढ व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघर्ष संघटनेच्या माध्यमातून मागणी करण्यात आली होती.नंदुरबार जिल्ह्यातील एक हजार 100 शिक्षक व शिक्षकेतर रोजंदारी कर्मचार्‍यांना लाभ मिळणार आहे.