नागोठणे । येथील सामाजिक कार्यकर्त्या शोभाताई फणसेकर यांचे जावई तथा खोपोली नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष काशिनाथ उर्फ राजू गायकवाड यांच्या वाढदिवसा निमित्त 15 सप्टेंबर रोजी येथील नागसेन एज्युकेशन अँन्ड बुद्धिष्ट कल्चरल ट्रस्टच्या डॉ. नेल्सन मंडेला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिवसेना उपविभागप्रमुख संजय महाडीक, ग्रा.पं.सदस्या स्वाती तुरे, सामाजिक कार्यकर्त्या शोभाताई फणसेकर तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी रोहे तालुका रा.कॉ. नागोठणे कार्यकारणी सदस्य निलेश म्हात्रे, युवक कॉग्रेस शहर अध्यक्ष निलेश घाग, ज्ञानेश्वर साळुंखे, खंडागळे, लीलाधर तुरे, किसन पानकर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ डोंगरगावकर यांचेसह शिक्षक तसेच रामनगर मधील नागरिक व साईनाथ महिला बचत गटातील सदस्या उपस्थित होते. यावेळी निलेश घाग यांनी आपले विचार व्यक्त करून गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या.