किन्हवली । शहापूर तालुक्यातील शेणवे येथील आदिवासी आश्रम शाळेत मराठी रंगभूमी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे येथील परिधी लव्या या नाट्य संस्थेच्या कृपया ईकडे लक्ष द्या व मु.पो.पाळणाघर या दोन बालनाटिकांचा 25 वा प्रयोग सादर करण्यात आला. या बालनाटिकांच्या निर्मात्या मधुरा गुजर या असून लेखन, दिग्दर्शन अमित जोशी यांनी केले आहे.बालकलाकार ग्रामीण भागातले असले तरी तोडीसतोड अभिनय करत होते. त्यामुळे विद्यार्थी दर्शकांतून टाळ्या व शिट्टयांचा पाऊस बरसत होता.
शिक्षणाच्या अनावस्थेबद्दल सरकारी धोरणांना जबाबदार न धरता पालक, शिक्षक व विद्यार्थी यांनीच शिक्षण व्यवस्थेकडे सकारात्मक बघण्याची मानसिकता ठेवावी. शहरांमध्ये ठिकठिकाणी उघडलेल्या पाळणाघरात बालकांची होणारी फरफट हे वास्तव या दोन्ही नाटिकांमध्ये समग्रपणे मांडले आहे. सध्याच्या शैक्षर्णिक व्यवस्थेवर भाष्य करत त्याद्वारे जनप्रबोधन करण्याचा प्रयत्न या नाटकांच्या माध्यमातून करण्यात आला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांबाबतची अनास्था नाटकांच्या माध्यमातून यावेळी बोलून दाखवली.
यांची होती उपस्थिती
बालकलाकार ग्रामीण भागातले असले तरी तोडीसतोड अभिनय करत होते. त्यामुळे विद्यार्थी दर्शकांतून टाळ्या व शिट्टयांचा पाऊस बरसत होता. नाटकांमध्ये बालकांनी केलेल्या नाट्य कलांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद देत त्यांची यावेळी प्रशंसा केली. या कार्यक्रमात या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरविंद भानुशाली, पत्रकार दीपक हिरे, शामकांत पतंगराव, भास्कर घोडविंदे, अमित जोशी व मधुरा गुजर आदी मान्यवर उपस्थित होते.