यावलला मोफत मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर
यावल- समाजातील ज्येष्ठ, गोर-गरीबांचे नेत्रदोष दूर करीत त्यांना पुन्हा नवी दृष्टी देण्याचे महत्चाचे कार्य गेल्या नऊ महिन्यांपासुन आश्रय फाऊंडेशन करीत आहे. हे कार्य कौतुकास्पद आहे त्याचं दृष्टीने प्रशासनाकडूून सर्वसामान्यांच्या आरोग्याकरीता पावले उचलली जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आयुष योजना’ सुरू केली असून त्यात गोरगरीब कुटुंबियांना वैद्यकीय उपचारार्थ पाच लाखांची मदत दिली जाईल, अशी माहिती आमदार हरिभाऊ जावळे यांनी दिली. ते गुरूवारी यावलला मोफत मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात बोलत होते.
यांची प्रमुख उपस्थिती
शहरात गणपती उत्सवात एक वेेगळा पायंडा म्हणून सेवाभाव जोपासण्याचे कार्य करीत गावातील महाजन गल्लीत विठ्ठल मंदिरात नवभारत गणेश मंडळाच्या वतीने व यावल-रावेर येथील डॉक्टरांच्या आश्रय फाऊंडेशन आणी कांताई नेत्रालयाच्या सहकार्याने गुरूवारी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आलेे. अध्यक्षस्थानी आमदार हरीभाऊ जावळे होते. प्रमुख उपस्थिती प्रगतशील शेतकरी प्रमोद नेमाडे, फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी, भाजपचेे जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, भाजप शहराध्यक्ष हेमराज फेगडे, धीरज महाजन, माजी नगरसेवक उमेश फेगडे, नितीन महाजन, डॉ.पराग पाटील, डॉ.प्रशांत जावळे, पुुंडलिक बारी, भुषण फेगडे, कांताई नेत्रालयाचेे युवराज देसरडा, किशोर राणेंसह मान्यवरांची उपस्थिती होती. शिबिरात 184 रुग्णांची तपासणी करण्यात आली तर त्यातील शस्त्रक्रियेस पात्र 26 रुग्णांवर जळगावस्थित कांताई नेत्रालयात मोफत शस्त्रक्रीया करण्यात आली. सूत्रसंचालन एस.के.बाऊस्कर यांनी तर आभार डॉ. पराग पाटील यांनी मानले. संजय फेगडे, निर्मल चोपडे, हेमंत फेगडे, कल्पेश चौधरी, स्नेहल फिरके, उज्वल कानडे, बंटी करांडे, धीरज फेगडे, विशाल फे्गडे, रीतेश बारी आदींनी परीश्रम घेतले.