नगरदेवळा। येथून जवळच असलेल्या आखतवाडे येथील ग्रामस्थांचे विविध मागण्यांचे उपोषण तहसिलदार कार्यालयासमोर सुरु होते. शनिवारी 19 रोजी माजी आमदार दिलीप वाघ, तहसीलदार बी .ए .कापसे यांच्या आश्वासनानंतर पाचव्या दिवशी सुटले. 15 ऑगस्टपासून त्यांनी उपोषण सुरु केले होते.
माजी आमदार दिलीप वाघ यांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता
गैरव्यवहार करणार्या संबंधीत सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा या मागण्यांसाठी माजी सरपंच संजय परदेशी ,रमेश परदेशी ,चांगो परदेशी ,गिरधर परदेशी व ग्रामस्थ उपोषणाला बसले होते. जन्म व मृत्यूच्या रजिस्टरमध्ये खाडाखोड प्रकरणी सात दिवसांत गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच दलित वस्तीच्या कामातील गैरव्यवहाराबाबत संबंधीत अधिकार्र्यांना आदेश देवून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे ठोस आश्वासन तहसीलदार बी .ए .कापसे यांनी उपोषणार्थी यांना दिल्यानंतर आखतवाडेचे माजी सरपंच संजय परदेशी व सहकार्यांनी आज पाचव्या दिवशी उपोषण मागे घेतले. तसेच दलित वस्तीच्या कामा संदर्भात सीईओंनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी अनिता राठोड यांची नियुक्ती केली असून त्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी कामाची पाहणी केली.