निजामपुर । साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील भामेर येथील आदीवासी महिला चित्राबाई सुका भील (माळचे) या 1 जुलै रोजी तहसिल कार्यालय समोर आत्मदहन करणार होत्या. परंतु, प्रशासनाने साक्री तहसीलदार संदीप भोसले यांनी आदीवासी महिलेला न्याय मिळवुन देऊ तसेच जमिनीचे मोजमाप करण्याचे आदेश सौरव ऊर्जा कंपनीला दिलेला तो पर्यंत कोणत्याही प्रकारचे त्या जागेवर करु देणार नाही आदीवासी महिलेला न्याय मिळवुन असे आश्वासन दिलेल्या आहे. यामुळे आत्मदहन तात्पुरते स्थगिती करीत आहे.
गावगुंडांकडून त्रास असल्याची तक्रार
भामेर शिवारात शेतजमिन गट नंबर 268/4 हीजमीन आमचा मालकीची आदीवासी भील समाजाची आहे. या शेत जमिनीवर बेहेरे. श्रीकांत वाघ, भामेरचे सरपंच मनोज सोनवणे हे बेकायदेशीर माझा शेतजमिनीवर सौरव उर्जा प्रकल्पाचे आमची संमती ना घेत अतिक्रमण करीत आहे. गांवगुंडांच्या मदतीने दमदाटी धाक दडपशाही दाखवुन हतबल करत असतात. याबाबत या महिलने प्रशासनाला अनेक निवेदन तक्रारी देवून ही न्याय न मिळल्याने आत्मदहनाचा इशारा दिला होता. परंतु, तहसीलदार संदीप भोसले यांनी आश्वासन दिल्यामुळे तुर्त स्थगिती देत आहे असे पत्रक काढले आहे. दैनिक जनशक्तीमुळे माझ्या तक्रारीची दखल घेण्यात आली यामुळे आभार मानले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मनिषा गुलाबराव पाटील व चेंतन कैलास शिंदे हे उपस्थितीत होते.