आश्‍वासनाअंती पटेल दाम्पत्याचे उपोषण स्थगित

0

जळगाव। बहुचर्चित सलमान पटेलच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या सलमान कुटुंबियांचे पालकांना कायद्याच्या चौकशीत न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन दिल्याने उपोषणाची सांगता झाली. सलमानच्या मृत्यू प्रकरणी आरोपींना लवकरात लवकर पकडून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करु असा विश्‍वास अप्पर पोलिस अधिक्षक यांनी बाबु इसा पटेल व हाजिरा बाबु पटेल या सलमनाच्या आई- वडिलांना दिल्याने त्यांनी उपोषण स्थगित केले.

यावेळी जमीयत उल्लेमाचे मुफ्ती हारुन नदवी यांनी मध्यस्थी करुन औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यातर्फे तपासात सकारात्मक गती देऊन संबंधितांविरुध्द कठोर कारवाईबाबत आश्‍वस्त केले. त्यांचेसमवेत हाफीज अ. रहिम, रियाज काकर, हाफीज इम्रान, अ.रज्जाक पटेल, हाफीज जुनेद, वसीम बाबु आदींची उपस्थिती होती.