आश्‍वासनानंतर कडेरे यांनी उपोषण घेतले मागे

0

भुसावळ। नगरपालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या विरोधात सुनिल कडेरे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु होते. 21 रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या आश्‍वासनानंतर उपोषण संपविण्यात आले. सेवानिवृत्त झालेल्या भुसावळ नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना धनादेश देण्यात यावे, सफाई कामगारांचे 1 ते 5 तारखेच्या आत वेतन देण्यात यावे अशा विविध 12 मागण्यांसह नगराध्यक्ष व मुख्याधिकार्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी सुनिल कडेरे यांनी उपोषण सुरु केले होते.

उपोषणाच्या सहाव्या दिवशी जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी कडेरे यांच्या मागण्या जाणून घेत आश्‍वासन दिल्याने उपोषण संपविण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांनी सुनिल कडेरे यांच्या अर्जावर 15 दिवसात कारवाई करावी. केलेल्या कारवाईचा तपशिल जिल्हाधिकारी कार्यालयास अवगत करण्याचे आदेश भुसावळ नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना दिले आहेत.