बोदवड । तालुक्यातील मनुर बु.॥ येथील 49 शेतकर्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरी ऑनलाईन मस्टर काढण्यासंदर्भात व ऑनलाईन मस्टर काढण्यासाठी शेतकर्यांनी उपोषण छेडले होते मात्र आश्वासन दिल्यानंतर शुक्रवारी उपोषण मागे घेण्यात आले. मनुर ग्रामपंचायतीने 30 मे 2016 ते 6 जून 2016 रोजी सिंचन विहिरी ऑनलाईन करण्यासाठी पत्र दिल्यानंतर दिड वर्षानंतरही विहिरी ऑनलाईन झाले नसल्याने लाभार्थी शेतकर्यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजेपासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली. उपोषणास्थळी पंचायत समिती गटविकास अधिकारी अशोक बाविस्कर यांनी उपोषणार्थींशी चर्चा केली. मनुर बु.॥ येथील 47 सिंचन विहिरी ऑनलाईन झाल्या मात्र सर्व विहिरी एक महिन्याच्या आत टप्प्या-टप्प्याने जॉब कार्ड धारक मजूर मागणीनुसार मस्टर काढण्यात येतील, असे आशयाचे पत्र उपोषणार्थींना देण्यात आल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
यांचा उपोषणात सहभाग
शेतकरी सुभाष सीताराम देवकर, संगीता कैलास सोनोनी , रमेश पाटील, हरी काकडे, परमेश्वर शेळके, विठ्ठल शेळके, संगीता शिवाळे, नाना पाटील, आशा इंगळे, एकनाथ वाणी यांच्यासह सिंचन विहिर लाभार्थी शेतकरी उपोषणास बसले होते. त्यांना सागर पाटील, ईश्वर जंगले, भरत आप्पा पाटील, जगन शेळके, किशोर गायकवाड आदी उपस्थित होते.