जळगाव । येथील स्व. वसंतराव चांदोलकर प्रतिष्ठान व भवरलाल जैन व कांतीबाई मल्टीपर्पज फौउेशनच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 4 रोजी संध्या. 6.30 वाजता ‘बोलावा विठ्ठल’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विठ्ठल भक्तीवर आधारीत या कार्यक्रमात शहरातील कन्या शाळा, सेंट जोसेफ स्कूल, ओरियन सीबीएससी, अत्रे इंग्लिश मिडीयम, अनुभूती स्कूल, शानबाग विद्यालय, गुरुकुल स्वराश्रय व प्रभाकर कला संगीत अकादमी या विद्यालयांची एकूण 125 विद्यार्थी सहभागी होणार आहे. यावेळी विविध भक्तीगीतांसह नृत्य व दिंडीतील खेळांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमास अनुभूतीच्या संचालिका निशा जैन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. बाल वारकर्यांच्या वेषभूषेतील सादर होणार्या संगीतमय वारीचा अनुभव घेण्यासाठी रसिकांनी अधिकाधिक उपस्थिती देऊन बाल कलावंतांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन उभय संस्थातर्फे करण्यात आले आहे.