जळगाव-आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली, खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांनी वारकरी व भाविकांसाठी विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे. जिल्ह्यातील भाविक आणि वारकरी आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. त्यांच्या सोयीसाठी 22 जुलै रोजी पंढरपूरसाठी विशेष रेल्वे सोडली जाणार आहे.
२२ रोजी सकाळी ९.१५ वाजता भुसावळ येथून निघेल व पंढरपूर येथे रात्री १०.१० मिनिटांनी पोहोचेल. २३ जुलैला रात्री ९.५० मिनिटांनी ही रेल्वे पंढरपूर येथून निघणार आहे. २४ जुलै रोजी दुपारी २.४० वाजता भुसावळ येथे पोहोचेल. वारकरी व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन खासदार रक्षा खडसे यांनी केले आहे.