भुसावळ- आषाढी एकादशीनिमित्त वारकरी आणि भाविकासाठी पंढरपूरज जाण्यासाठी नागपूर -मिरज आणि नागपूर-पंढरपूर विशेष रेल्वे गाड्याचे आयोजन मध्य रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. रेल्वे प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
नागपूर-पंढरपूर विशेष गाड़ी
गाडी क्रमांक 01206 ही विशेष गाडी दिनांक 10 जुलै रोजी नागपूर स्थानकावरून सकाळी 7.50 वाजेला पंढरपूर स्टेशनसाठी सुटेल. ही गाडी दुसर्या दिवशी सकाळी 4.10 वाजता पंढरपूर स्थानकावर पोहोचेल. गाडी क्रमांक 01205 ही विशेष गाडी 13 जुलै रोजी पंढरपूर स्थानकावरून पहाटे 5.30 वाजेला नागपूरसाठी सुटेल. ही गाडी रात्री 11.30 वाजता नागपूर स्टेशनला पोहोचणार आहे. या गाडीला अजनी, वर्धा, पुलगाव, धामनगाव, चांदुर, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगांव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्दुवाडी या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला 12 स्लीपर तर दोन थ्री टायर वातानुकूलित तसेच दोन जनरल कोच जोडण्यात येणार आहेत.
नागपुर मिरज विशेष गाडी
गाडी क्रमांक 01263 ही विशेष गाडी दिनांक 09 जुलै रोजी नागपूर स्थानकावरून सकाळी 7.50 वाजता मिरज स्थानकासाठी सुटेल. ही गाडी दुसर्या दिवशी सकाळी 7.15 ला मिरज स्थानकावर पोहोचेल. गाडी क्रमांक 01264 ही विशेष गाडी 14 जुलै रोजी मिरज स्थानकावरून पहाटे 2.15 वाजता नागपूरसाठी सुटेल. ही गाडी रात्री 11.30 वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल. या गाडीला अजनी, वर्धा, पुलगाव, धामनगाव, चांदुर, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जलगाव, मनमाड, कोपरगाँव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्दुवाडी, पंढरपूर, सांगोळा, म्हसोबा, डोंगरगाँव, जाट रोड, कवटे महाकाल, सलाग्रे ,अरग या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला 12 स्लीपर तर दोन थ्री टायर वातानुकूलित तसेच दोन जनरल कोच जोडण्यात येणार आहेत. या सर्व गाड्याचे आरक्षण बुकिंग 30 जूनपासून आरक्षण केंद्रावर सुरू होणार आहे.