शहादा । शहरासह परिसरात आषाढी एकादशीनिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर भक्तांनी विठ्ठल मंदिरात दर्शन घेवुन प्रसादाचा लाभ घेतला. पाडळदे बु.ता शहादा येथे आषाढी एकादशीनिमीत्त मुरली मनोहर कृष्ण मंदिरपासुन पालखीची मिरवणूक काढण्यात आली. गावात गल्ली बोळात पालखी नेण्यात आली सोबत भजनी मंडळ होते. मंदिराचे पुजारी शाम जोशी यांनी पुजाविधी केली. पालखीच्या मिरवणुकीत विठ्ठल नावाचा गजर झाला. दरम्यान कृष्ण मंदिराची सजावट केली होती.महिला भाविकांची संख्या मोठी होती. दरवर्षी आषाढी एकादशीला गावातील कृष्ण हनुमान व शनिमंदिर तसेच महादेव मंदिराचे नवीन ध्वज लावले जातात. जुने ध्वज उतरवण्यात येतात. पालखी मिरवणूकीत उत्तम पाटील,शरद पाटील, वसंत पाटील,प्रकाश सोनार, किशोर सोनार, राजेंद्र पाटील सहभागी झाले होते.
दिडशे वर्षांपुर्वीचे जुने विठ्ठल मंदिर
शहादा शहरात भोई गल्ली जवळील विठ्ठल मंदिरात भाविकानी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली होती.दिडशे वर्षांपूर्वीचे जुने विठ्ठल मंदिर असल्याने भाविकांची मोठी श्रध्दा आहे. भाविकांना प्रसाद वाटप केला. वारकरी संप्रदायाने भजनाचा कार्यक्रम केला होता. तर गुजर गल्लीत गेल्यावर्षीच विठ्ठलाचे मंदिर बांधण्यात येवुन प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. या मंदिरातही भाविकानी सकाळपासुन गर्दी केली होती.या ठिकाणी मंदिर ट्रस्टचे सुभाष पाटील,सुनिल पाटील,प्रा आर.टी.पाटील,गिरीष पाटील व सचिव सचिन सुदाम पाटील उपस्थित होते.लाडकोरबाई विद्यालयातर्फे शहरात आषाढी एकादशीनिमीत्त दिण्डी काढण्यात आली. दिंडीची सुरुवात संस्थेचे सचिव ड. ऱाजेश कुलकर्णी व प्रवीणा कुलकर्णी यांचे हस्ते केली. याप्रसंगी मुख्याध्यापिका माया जोहरी उपस्थित होते. दिंडीत विध्यार्थी शिक्षिका सहभागी झाल्या होत्या. दिंडी विद्यालयापासुन सोनार गल्ली, हुतात्मा चौक ,मेन रोड मार्गे भोई गल्लीतील विठ्ठल मंदिरापर्यन्त नेण्यात आली.