खानापूर- 36 वर्षांपासून अव्याहतपणे श्री क्षेत्र पंढरपूरसाठी निघत असलेल्या पायी दिंडीचे खानापूर येथे गुरूवारी प्रस्थान झाले. हभप अरुण महाराज (बोरखेडेकर) यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी प्रमुख विणेकरी ह.भ.प.भगवंत महाराज (खानापूर) आहेत. आषाढी एकादशीनिमित्त खानापूरहुन प्रस्थान झालेल्या पायी दिंडीचा पहिला मुक्काम चिनावल राहिला. पुढील मुक्काम हंबर्डी, खडका, जामनेर, भारुड खेडा, गोरेगाव, सिल्लोड, भोकरदन, केदारखेडा, बावनपाग्री, जालना, हंबड, शहागड, पाडळशिंगी, बीड, उंडणगाव, पारगाव, भूम, कोरेगाव, बार्शी, वडशिंगी, उपलाई, आष्टी असा राहणार आहे. या दिंडीत हभप अंबादास महाराज, नामदेव महाराज, अमोल महाराज, डिगंबर महाराज यांच्यासह शेकडो भाविक सहभागी झाले आहेत.