भुसावळ- आषाढी एकादशीनिमित्त 22 जुलै रोजी भुसावळ येथून सकाळी नऊ वाजता विशेष रेल्वे पंढरपूरसाठी रवाना होणार आहे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शना खाली व खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने ही रेल्वे दोन वर्षांपासून सुरू करण्यात आली आहे. ही गाडी जळगाव स्थानकावर 9.45 वाजता, पाचोरा स्थानकावर 10.20 वाजता तर चाळीसगाव स्थानकावर 10.55 वाजता पोहोचेल. माजी मंत्री खडसे, खासदार रक्षा खडसे या गाडीला झेंडा दाखवणार आहेत. या गाडीचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार रक्षा खडसे यांनी केले आहे.