जळगाव । सिमी खटल्यांतील संशयीत म्हणून जळगाव येथील मास्टर कॉलनीतील रहिवाशी असलेल्या आसिफ बशीर याला एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतले होते. सिमी खटल्यात सहभाग असल्याचा संशय घेत न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. गेल्या 11 वर्षापासून तो तुरुंगात आहे. आसिफ बशीर हा निर्दोष असून त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आल्याने न्यायालयाने त्यांच्यावर अन्याय केले असल्याचा आरोप अब्दुल वाहीद शेख यांनी केले आहे. अब्दुल वाहीद शेख यांना 2001 मध्ये सिमी खटल्यातील संशयीत म्हणून तुरुंगात टाकण्यात आले होते. ऑर्थररोड तुरुंगात असतांना त्यांने ’बेगुनाह कैदी’ हे पुस्तक लिहले आहे.
पुस्तकाबाबत थोडेसे…..
या पुस्तकात मुस्लीम समुदायातील निर्दोष बांधवांना कशा प्रकारे विविध खटल्यात अडकविण्यात आले आहे. तसेच न्यायालय व पोलीस प्रशासन यांच्या निर्दयीपणाविषयी या पुस्तकात लेखन करण्यात आलेले आहे. या पुस्तकाविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुस्लीम समुदायातील निर्दोष 12 जणांना सिमी खटला, मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी तुरुंगात डांबण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या सुटकेसाठी जमीअत उलमा-ए-हिंद ही संघटना कार्य करीत असून आता पर्यत अनेकांना स्वःखर्चाने संघटनेने तुरुंगातून सोडवून आणले आहे. आशिद बशीरला सोडविण्यासाठी संघटनेतर्फे प्रयत्न सुरु असल्याचे संघटनाध्यक्ष मुफ्ती हारुल नदवी यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अजीत शाही, भारत मुक्ती मोचार्च जिल्हाध्यक्ष मुकुंद सपकाळे, आशिफ बशीर यांचे कुटुंबीय उपस्थित होते. जमीअत-ए-उलमातर्फे अब्दुल वाहीद शेख लिखीत बेगुनाह कैदी या पुस्तकाचे प्रकाशन इकरा एच.जे.थीम महाविद्यालयात करण्यात आले.