मनपा पदाधिकारी, अधिकारी आज करणार पाहणी
जळगाव: आसेदा रेल्वेगटच्या ठिकाणी उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु करण्यात येत आहे.त्यामुळे 1 फेब्रुवारीपासून रेल्वे गेट बंद करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात येत आहे. याबाबत रेल्वे विभागाने पत्र पाठवून मनपाला कळविले आहे. दरम्यान, वाहतुकीच्या पर्यायी मार्गासाठी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग सूचविण्यात आला आहे. उद्या दि.29 रोजी दुपारी 4 वाजता मनपा पदाधिकार्यांसह अधिकारी पाहणी करणार आहेत.
उड्डाण पुलाचे बांधकाम सुरु करण्यात येणार असल्यामुळे आसोदा रेल्वे गेट बंद करुन आसोदा – ममुराबाद-जळगाव असा वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग सूचविण्यात आला आहे. याबाबतचे रेल्वे प्रशासनाचे पत्र प्राप्त झाले आहे. ममुराबाद रोड चौघुले प्लॉटमधील पुलावरुन वाहनधारकांसाठी मार्ग असणार आहे. त्यामुळे उद्या दि.29 रोजी दुपारी 4 वाजता महापौर भारती सोनवणे, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, स्थायी सभापती अॅड. शुचिता हाडा यांच्यासह आयुक्त उदय टेकाळे, बांधकाम अभियंता सुनील भोळे, पा.पु. अभियंता डी.एस. खडके यांच्यासह अधिकारी पाहणी करणार आहेत.
महापौरांनी घेतला आढावा
अमृत अंतर्गत पाणीपुरवठा योजना आणि भूमिगत गटारी योजनेच्या सुरु असलेल्या कामासंदर्भात महापौर भारती सोनवणे यांनी आढावा घेतला. कामाची गती वाढविण्यासंदर्भात सुचना दिल्या.तसेच आठवडाभरात एलईडी लावण्याची देखील सुचना दिली आहे.