जळगाव : तालुक्यातील आसोदा येथे घरासमोरुन 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी लांबवली. जळगाव तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकी चोरीचे सत्र कायम
आसोदा येथे हंसराज सदू जाधव (60) हे वास्तव्यास आहेत. 19 मे रोजी हंसराज जाधव यांनी नेहमीप्रमाणे त्यांची दुचाकी (एम.पी.68 एम.एफ. 0267) घरासमोर उभी केली असता चोरट्यांनी मध्यरात्री ती लांबवली. हंसराज यांनी शुक्रवारी तालुका पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक ज्ञानेश्वर कोळी हे करीत आहेत.