जळगाव । कालबध्द वेतन श्रेणी पदोन्नतीच्या बैठकीत सात मुद्यांवर चर्चा करण्यात आली असतांना टिपणीत आठ मुद्दे घेतल्याने अस्थापना अधिक्षक राजेंद्र पाटील व लिपीक विलास निकम यांना उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी बजावली आहे. महानगर पालिकाअंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचार्यांना ज्यांना 12 व 24 वर्ष पूर्ण झालेली आहे अशा सर्व कर्मचार्यांना अश्वासीत प्रगती योजनेचा लाभ (कालबद्ध वेतन श्रेणी) देण्याची तरतुद आहे.
यानुसार पदोन्नती समिती गठीत करण्यात आली होती. यात शासनाच्या नियमानुसार पात्रता धारण केलेल्या कर्मचार्यांनाच कालबध्द वेतन श्रेणी लागू करावी असे म्हटले आहे. यानुसार अस्थापन विगाने प्रस्ताव तयार करून 28 जून रोजी झालेल्या पदोन्नती समितीच्या बैठकीत सादर केले. या बैठकीत केवळ सात मुद्यांवर चर्चा झालेली असतांना आस्थपना विभागाच्या आठ मुद्दे समाविष्ट करण्यात आले. यातून समितीची दिशाभूल केल्याचे दिसल्याने आस्थपना अधिक्षक राजेंद्र पाटील, लिपक विलास निकम यांना शिस्तभंगीची नोटिस उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी दिली आहे. नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसात खुलासा सादर न केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा या नोटीसीमध्ये देण्यात आला आहे.