रावेर : तालुक्यातील अहिरवाडी दंगल प्रकरणी रावेर पोलिसांनी 11 आरोपींना अटक केली आहे या मध्ये सुधाकर लहासे, नरेंद्र लहासे, कपील लहासे, गोपाळ वानखेडे, राहुल तायडे, हरी मेढे, रामकृष्ण मेढे, सागर मेढे, दिनकर मेढे, प्रल्हाद वाघ, ताराचंद लहासे यांचा समावेश आहे. ते पोलिस स्टेशनला हजर झाले असून आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे तपासधिकारी फौजदार दीपक ढोमने यांनी दैनिक जनशक्तीशी बोलतांना सांगितले.