आहेर गार्डन येथे रविवारी ‘खान्देश जल्लोष-2018’

0

खान्देश खाद्य मेळाव्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन

पिंपरी-चिंचवड : अखिल भारतीय खान्देश मंचासह खान्देशी समाजाच्यावतीने रविवारी (दि.22) वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन येथे सायंकाळी पाच ते नऊ वाजेदरम्यान ‘खान्देश जल्लोष-2018’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सर्व समाजीय खान्देशी बांधव सहभागी होणार आहेत. गंगापूजन, खान्देश सौ. स्पर्धा, वैभव खान्देशन मातीनं, पैठणी मानकरी, खान्देश खाद्य मेळावा, खान्देश सन्मान पुरस्कार अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल या कार्यक्रमात राहणार असून, खान्देशी बांधवांनी सहकुटुंब या कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

खान्देश मानकरींचा होणार सन्मान
चिंचवड येथील आहेर गार्डन येथे हा जल्लोषी कार्यक्रम सादर होत आहे. यावेळी गंगापूजन, सौ. खान्देश यासह वैभव खान्देशना मातीनं या सांस्कृतिक कार्यक्रमदेखील पार पडणार आहे. तसेच, खान्देश मानकरी हा सन्मान सोहळा पार पडणार असून, त्यानंतर स्पर्धा पारितोषिक वितरण होणार आहे. लकी ड्रॉ. पैठणीचे वाटप केले जाणार असून, खान्देश खाद्य मेळाव्यातील विविध रुचकर खान्देशी पदार्थांचा लाभही उपस्थितांना घेता येणार आहे. तरी खान्देश समाज बांधवांनी व भगिनींनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विजय पाटील, किरण चौधरी, महेंद्र पाटील, रेखा भोळे, विभावरी इंगळे, सुरेखा सोनवणे, किरण पाचपांडे यांच्यासह नगरसेवक नामदेव ढाके, ज्येष्ठ उद्योगपती मिलिंददादा चौधरी, सिद्धिविनायक उद्योग समूहाचे अध्यक्ष कुंदन ढाके यांनी पुढाकार घेतला आहे.