शिरपूर। बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या शिरपूर येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते जनक विला या आमदार कार्यालय येथे करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, पेढे देऊन त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा प्रसंगी माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे सचिव प्रभाकरराव चव्हाण, संस्थेचे क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल, प्राचार्य पी.व्ही.पाटील, प्राचार्या सौ. एम. एस. अग्रवाल, प्राचार्य एस. बी. पवार, प्राचार्य व्ही. आर. सुतार, प्राचार्य आर.एफ.शिरसाठ, प्राचार्य एन.सी. पवार, प्राचार्य एच.के.कोळी, प्राचार्य ए.पी.ठाकरे, प्राचार्य पी.डी.पावरा, प्राचार्य मुबिनोद्दीन शेख, सचिन बागुल, डी. बी. माळी, नितीन कलाल, रवींद्र खुटे, नितीन विविध शाखांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उज्ज्वल यशाची परंपरा कायम
आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाने यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली असून संस्थेच्या 12 शाखांचे निकाल 100 टक्के लागले आहेत. सर्व यशस्वी, संस्थेच्या वतीने व सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. संस्थेच्या 1585 पैकी 1577 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून संस्थेचा निकाल 99.50 टक्के लागला. 358 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, 1119 प्रथम श्रेणीत यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले. भूमि प्रितेश पटेल ही 90.15 टक्के गुण मिळवून शिरपूर तालुक्यात विज्ञान विभागात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तसेच एच. आर. पटेल कन्या कनिष्ठ महाविद्यालयाची नितीशा पोपटराव सोनवणे 87.54 टक्के गुण मिळवून कला विभागातून तालुक्यातून प्रथम आली. वाणिज्य शाखेतून आर.सी. पटेल कनिष्ठ महाविद्यालयाची खुशबू पंकज पटेल हिने 89.23 टक्के गुण प्राप्त करून तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, नगरसेवक तपनभाई पटेल, सर्व संचालक, सीईओ डॉ. उमेश शर्मा, सर्व प्राचार्य यांनी कौतुक केले आहे.