आ.अमरिश पटेल यांच्यावर धुळे व नंदुरबार लोकसभेची जबाबदारी

0

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा निर्णय

शिरपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अ.भा.काँग्रेस कमिटीचे महासचिव खा. मल्लिकार्जुन खर्गेे व खा. के.सी. वेणुगोपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत विधानपरिषद सदस्य अमरिश पटेल यांच्यावर धुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी सोपविण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असल्याचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.
धुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार तसेच या मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीतील इतर सहयोगी पक्षाच्या नेते मंडळींशी संपर्क साधून काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी होण्यासाठी आमदार अमरिश पटेल यांनी योग्य ते नियोजन करावे असे काँग्रेस कमिटीच्या पत्रकात म्हटले आहे.आ.अमरिश पटेल यांच्यावर सोपविण्यात आलेल्या या मोठ्या जबाबदारीबद्दल माजी मंत्री रोहिदास पाटील, नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अ‍ॅड. के. सी. पाडवी, धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कुणाल पाटील, आ. काशीराम पावरा, आ.डी. एस. अहिरे, आ. चंद्रकांत रघुवंशी,आ.आसिफ शेख, आ. दीपिका चव्हाण, धुळे जि.प.अध्यक्ष शिवाजीराव दहिते, माजी आ.राजवर्धन कदमबांडे, धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, मालेगाव शहराध्यक्ष रशीद शेख, नाशिक काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, नंदुरबारचे कार्याध्यक्ष दीपक पाटील, धुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, शिरपूर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनी स्वागत केले आहे.