शहादा । तालुक्यातील राणीपुर येथील राणीपुर धरणावर आमदार उदेसिंग पाडवी यांचा हस्ते जलपुजन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी साताळकर , तहसीलदार मनोज खैरनार, नायब तहसीलदार डॉ. उल्हास देवरे , भाजपा तालुका अध्यक्ष किशोर पाटील दिनेश खंडेलवाल ,अतुल जयस्वाल , मनोज चौधरी, राणिपुरचा सरपंच, ग्रामस्थ ग्यानसिंग रावताळे, संतोषगिरासे ,रामभाऊ भोसले,भारत पराडके ,मंडळ अधिकारी धाकड ,झेलसिंग पावरा सह आदि मान्यवर उपस्थित होते.
विंधन विहिरींना पाणी
राणीपूर धरणाचा पाण्याची पातळी वाढल्याने परिसरातील सर्व ग्रामस्थ व शेतकरी सुखावला आहे व त्यांचामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राणीपुर धरण 2006 मध्ये अतिवृष्टीझाल्यामुळे भरले होते. त्यानंतर साधारण 11 वर्षानंतर एवढ्या मोठ्याप्रमाणावर धरणात पाणी जमा झाले आहे. यामुळे परिसरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. विंधिन विहिरीना पाणी आले असून शेतकर्यांना देखील या पाण्याचा लाभ मिळणार असल्याने शेतकरी आनंदित आहेत.