आ.एकनाथराव खडसेंची अपघातग्रस्तांना मदत

0

जळगाव । अमळनेर चोपडा रस्त्यावर, पातोंडा च्या पुढे मुसळधार पावसामध्ये एका काली-पिली जीप चा अपघात होऊन सदरील वाहन रस्त्याच्या कडेला खोल चारी मध्ये पलटी झालेले होते.यामार्गावरून माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे आपल्या ताफ्यासह जात असतांना घटनास्थळी थांबून अपघातग्रसतांना मदत केली.

आ.खडसे अमळनेर-चोपडा रस्त्याने रविवारी जात असतांना पातोंडाच्या पुढे एक कालीपिली गाडीचा अपघात होवून ती रस्त्याच्या कडेला खोल चारीमध्ये पलटी झाली होती. कालीपिलीच्या मागील दरवाज्यातुन एक महीला रडत मदतीकरीता ओरडत बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होती. हे अपघातदृष्य नाथाभाऊंनी पाहीले व तात्काळ गाडी थांबवुन सोबत असलेल्या नगरसेवक रविंद्र पाटील अंगरक्षक, पोलिस व कार्यकर्त्यांच्या मदतीने 3 महीला 1 लहान मुलगा व 3 पुरुषांना अपघातग्रस्त वाहनातुन बाहेर काढले. जखमींची विचारपुस करुन तात्काळ ताफ्यातील पोलिस स्कॉट च्या गाडीत बसवुन शासकीय रुग्णालयात दाखल केले व जखमींवर तात्काळ उपचार करण्याच्या सुचना त्यांनी डॉक्टरांना दिल्या.