आ एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त कुऱ्हा येथे मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर आणि रोहिणी खडसे यांचा सत्कार सोहळा संपन्न
मुक्ताईनगर प्रतिनिधी – माजी महसुल मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त कुऱ्हा ग्रामपंचायत लोकनियुक्त
सरपंच डॉ बी. सी .महाजन आणि कुऱ्हा ग्रामपंचायत सदस्य यांच्या तर्फे मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर
आणि रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुऱ्हा तर्फे रोहिणी खडसे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी मंत्री आ एकनाथराव खडसे यांच्या हस्ते नेत्ररोग तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले
शिबिरात 275 रुग्णांची नेत्र रोग तपासणी करण्यात आली
शिबिरात नेत्ररोग शल्य चिकित्सक डॉ प्रविण पाटील, नेत्ररोग अधिकारी युवराज ठोमरे, तुषार जोशी यांनी रुग्णांना सेवा दिली शिबिरात मोफत मोतीबिंदू तपासणी व मोफत टाके विरहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
कुऱ्हा , ग्रामपंचायत कुऱ्हा, विविध कार्यकारी सोसायटी कुऱ्हा यांचे तर्फे नागरी सत्कार करण्यात आला
यावेळी सत्काराला उत्तर देताना रोहिणी खडसे म्हणाल्या
पक्ष नेतृत्वाने दिलेल्या जबाबदारीला पुर्ण क्षमतेने पार पाडून पक्षाचे विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहचवून पक्ष संघटन वाढवून जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल यासाठी आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी साथ द्यावी असे उपस्थित पदाधिकाऱ्यांना त्यांना आवाहन केले आणि सत्कार केल्या बद्दल आयोजकांचे आभार मानले
आ.एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद असून यामुळे गरजु रुग्णांना फायदा होणार आहे
या लोकोपयोगी कार्यक्रमाने आ. एकनाथराव खडसे साहेब यांचा वाढदिवस साजरा होत आहे यात मोठा आनंद असल्याची भावना रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली
यावेळी मनोगत व्यक्त करताना आ .एकनाथराव खडसे म्हणाले माझ्या वाढदिवसानिमित्त नेत्र रोग तपासणी शिबीर आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले हा जनहिताचा कार्यक्रम कौतुकास्पद आहे
एखाद्या व्यक्तीला दृष्टी प्राप्त होईल याहून मोठा आनंद नाही
कुऱ्हा ग्रामपंचायत मध्ये नविन सरपंच सदस्य निवडून आल्यापासून अनेक विकास कामे व नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत कुऱ्हा गावाच्या विकासासाठी आतापर्यंत कोट्यवधींचा निधी दिला भविष्यात सुद्धा निधीची कमतरता भासू देणार नाही
रोहिणी खडसे यांची महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाली ताई नक्कीच पक्ष वाढीसाठी चमकदार कामगिरी करतील येता काळ हा युवा वर्गाचा असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिन आर आर. यामध्ये रोहित पवार, रोहिणी खडसे, रोहित पाटील हे युवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जोमाने कार्य करून युवा वर्गाला पक्षा सोबत जोडतील असा विश्वास व्यक्त केला
यावेळी कुऱ्हा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते