आ.कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा

0

धुळे । जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टच्यावतीने आ.कुणाल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन धुळ्यात आमदार कुणालबाबा राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने 18 सप्टेंबर रोजी धुळे तालुक्यात विविध समाज उपयोगी व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टने महाविद्यालयीन पातळीवर राज्यस्तरीय वक्तृत्वस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

15 सप्टेंबरपर्यंत नाव नोंदणीचे आवाहन
स्पर्धेतील विषय पुढीलप्रमाणे आहेत. शेतकरी आत्महत्या आणि उदासिन सरकार, महाविद्यालयीन निवडणूका फायदे/तोट, राजकारणापलिकडचे दाजीसाहेब, कर्जमाफीसाठी आक्रोश आणि असंवेदनशील सरकार, राजसत्तेला धार्मिक मुलामा चढतोय का?. स्पर्धेतील प्रथम विजेत्यास 15 हजार, व्दितीय क्रमांकास 11 हजार, तृतीय क्रमांकास 7 हजार आणि उत्तेजनार्थ सात पारितोषिके प्रत्येकी 1001 रुपयाचे बक्षिसे देण्यात येतील तर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश शुल्क नसून स्पर्धेसाठी 18 ते 25 वयाचे बंधन असून शिकत असलेल्या महाविद्यालयाचे पत्र किंवा ओळखपत्र आवश्यक आहे. स्पर्धेसाठी एका महाविद्यालयाचा एकच विद्यार्थी सहभागी होऊ शकतो.लांबून येणार्‍या स्पर्धकांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्पर्धा 18 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा. एसएसव्हीपीएस कला व वाणिज्य महाविद्यालयात होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दि.15 सप्टेंबरपर्यंत आपली नाव नोंदणी करावी.