जळगाव। शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळून त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहीजे, यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातील विरोधकांनी पुन्हा एकदा संयुक्त संघर्ष यात्रा काढली आहे. संघर्ष यात्रेच्या दुसर्या टप्प्यात 15 एप्रिल रोजी विरोधक जळगाव जिल्ह्यात दाखल झाले होते.
यावेळी विरोधकांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मुक्ताईनगरमध्ये भेट घेतली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते विखे पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी खडसेंच्या फार्म हाऊसवर त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी विरोधपक्षातील नेत्यांनी आ खडसे यांच्या फार्महाऊसवर चहापान फराळाचा आस्वाद घेतला. या राजकीय फराळाची सध्या प्रचंड चर्चा जोरात सुरू आहे.