आ. खडसेंना न्याय मिळावा यासाठी दीड महिन्यांपासून उपवास

0

भुसावळ : आ. एकनाथराव खडसे यांच्यावरील अन्याय दूर होऊन त्यांना मंत्रीमंडळात पुन्हा स्थान मिळावे म्हणून वरणगाव येथील सागर मराठे या 21 वर्षीय युवकाने दीड महिन्यांपासून उपवास सुरू केला आहे. याशिवाय तो पादत्राणेदेखील घालत नसून त्याने नाथाभाऊंसाठी मारूतीला साकडे घातले आहे. या लहान कार्यकर्त्याचा हा संकल्प सर्वत्र कौतुकाचा विषय बनला आहे.

…तोपर्यंत उपवासाचा निर्धार
वरणगाव येथील जावळे वाड्यातील सागर प्रकाश मराठे (वय 21) या युवकाने गेल्या दीड महिन्यापासून एक वेळेचे जेवण आणि पायात पादत्राणे न घालता अनवाणी उपवास सुरु केले आहे. तो सप्तश्रृंगी महिला बचत गट अतर्गत असलेल्या दुध डेअरीत मजूरी करीत आहे. त्याने आमदार एकनाथराव खडसे यांच्या पुणे येथील एमआयडिसी जमीन प्रकरणी बिनबुडाचे आरोपांच्या नावाखाली मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्याच अनुषंगाने वरणगावातील पक्षनिष्ठ नाथाभाऊंवर प्रेम करणार्या सागरने जोपर्यंत खोट्या आरोपातून मुक्तता मिळत नाही व पुन्हा मंत्रीपदावर येत नाही. तोपर्यंत उपवासाचा निर्धार घेतला आहे. सागर हा भाऊंच्या सहवासात नसतांना हा लहान कार्यकर्ता भाऊंवर अथांग प्रेम करणारा आहे.

घरात एकटा कर्ता पुरूष
ही वार्ता नाथाभाऊच्या कानी पडली असता त्यांला आश्वासन दिले की, मी स्वतः तुझा उपवास सोडविण्याकरीता वरणगावला येणार असल्याचे मोबाईलवरून सागरला सांगितले. नाथाभाऊ जातपात, वर्णभेद पाहत नाही म्हणून मी भाऊंना न्याय मिळण्यासाठी संकल्प केला आहे. तसेच भाऊंचा जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात दबदबा कायम असतांना त्यांनी मंत्रीपदावर असतांना विकास कांमाचा धडाका लावला होता. सागरच्या वडीलांचे निधन झाले असून घरात एकटा कमावता आहे. त्याची परिस्थिती हलाखीची आहे. त्यावर भाऊ, बहिण आणि आईची जबाबदारी आहे. सागर हा येथील नगरसेवक सुनिल काळे यांच्या परिचयातला असून त्यांच्या या संकल्पाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.