आ. खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा

0

मुक्ताईनगर प्रतिनिधी । माजी महसूलमंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील खडसे महाविद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली.

मुक्ताईनगर येथील श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयात या स्पर्धेचे उदघाटन खासदार रक्षाताई खडइे यांच्याहस्ते करण्यात आले. परीक्षेस महाविद्यालयीन स्तरावरील ४५० विद्यार्थी उपस्थित होते. या परीक्षेत प्रथम क्रमांकाचे रुपये २ हजार १०० रुपयाचे पारितोषिक विभागून कु. कुरकुरे जागृती संजय व टोकरे वैभव राजेंद्र यांनी मिळविले तर द्वितीय क्रमांकाचे १ हजार १०० रुपयांचे पारितोषिक विभागून पठारे अभिषेक रावसाहेब, पाटील अक्षय कैलास, शेंदुरकर श्‍वेता लीलाधर व जावरे सागर गजानन यांना तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून लोखंडे शितल निवृत्ती ,खिरोळकर अर्जुन विपुल व आवारकर मेघा श्रीकृष्ण यांनी मिळविले.

याप्रसंगी खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, ग्रामीण भागामध्ये गुणवत्ता खूप आहे. मात्र, कस्तुरी मृगाप्रमाणे आपल्यालाच आपल्याजवळ असलेल्या गुणवत्तारुपी कस्तुरीचा पत्ता लागत नाही.तरी वेळीच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षाकडे वळून यशस्वीतेची कास धरावी. याप्रसंगी व्यासपीठावर मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. सी. एस. चौधरी, मुक्ताईनगरचे नितीन जैन, महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. आर. पाटील,उपप्राचार्या श्रीमती एन.ए. पाटील, उपप्राचार्य एस. एम. पाटील तसेच इतर प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होते.