आ. गोटेंच्या वक्तव्याची चौकशी करा

0

धुळे । वृत्तपत्रातुन पत्रक जाहीर करून विकास कामे थांबविण्यासाठी10 लाख रूपयांची सुपारी दिल्याचे तसेच दंगल घडविण्याचा कट रचला जात असल्याचे आ.अनिल गोटे यांनी म्हटले असून त्यांच्या मुद्यांची सखोल चौकशी करावी तसेच त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हा अधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी म्हटले आहे की, दि.26 रोजी शहराचे आमदार अनिल गोटे यांनी वृत्तपत्रातून एक पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. हे पत्रक धादांत खोटे व लबाडीचे असून जनता आणि प्रशासनाची दिशाभूल करणारे आहे. या पत्रकात पांझरा किनारी सुरु असलेल्या 11 कि.मी.च्या रस्त्यांना सुपारीसह दंगलीची शक्यता वर्तविणार्‍या आ.गोटेंच्या वक्तव्याची चौकशी करा.

नदीपात्र घटविण्यात आले
मनमानी पध्दतीने रस्त्यांचे रेखांकन करून नदीपात्र घटविण्यात आले आहे. शिवाय रस्त्यांसाठी बांधल्या जाणार्‍या कॉक्रिट भिंतीमुळे नदीपात्रात येणारे पाण्याचे झरे बंद होणार आहे. शेकडो वर्षांचे वृक्ष देखील छाटण्यात आले आहे. या सर्वांची चौकशी व्हावी म्हणून गेले वर्षभर शासन दरबारी पाठपुरावा सुरु आहे. न्यायालयातही दाद मागितली आहे. या रस्त्यांमुळे पर्यावरणाचा र्‍हास शिवाय शहराची ओळख असलेली व अस्मिता असलेली प्राचीन मंदीरे, नदीकाठचे घाट उध्वस्त होणार आहेत. असे असतांना एक लोकप्रतिनिधी म्हणून पुर्वसूचना देण्याचे कर्तव्य मानीत आ.गोटे यांनी 10 लाख रूपये घेवून शहरात दंगल घडविण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप केला आहे.

सुपारी देणारा बाबा कोण ?
यापुर्वी 2008 साली झालेल्या दंगलीत 13 दिवसांच्या संचारबंदीने शहरवासियांचे जीवन उध्वस्त झाल्याचा इतिहास आहे. त्यावेळी देखील आ.गोटे यांनी असेच दंगलीची पुर्वसूचना दिल्याचे म्हटले होते. त्यामुळे आताही त्यांनी दिलेल्या पुर्वसूचनेचा गंभीर विचार करून चौकशी व्हावी. त्यांनी उल्लेख केलेला व सुपारी देणारा बाबा कोण? याचा शोध घ्यावा. तसेच माझ्यासह आ.गोटेंचे फोनकॉल रेकॉर्ड तपासून सत्य शोधून काढावे, अशी मागणी नरेंद्र परदेशी यांनी या पत्रकातून केली आहे

’बाबा’चे चौकशीचे आव्हान स्वीकारले
आ. गोटे यांनी ‘बाबा‘च्या चौकशीचे आव्हान किंवा आवाहन स्वीकारले असल्याचे जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यांच्याकडे पुरेसा पुरावा असल्याशिवाय ते कोणतेही व्यक्तव्य करीत नाहीत. होवून जावू द्या एकदा चौकशी असे म्हटले आहे. धुळे, नाशिक व जळगाव जिल्ह्यांतील जनतेला कळू द्या कुणाचाही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उल्लेख केलेला नसतांना सेना-राष्ट्रवादीचे संयुक्त नगरसेवक नरेंद्र परदेशींना टोपी त्यांच्याच मापाची आहे असे का वाटत आहे असा टोला लगवला आहे.

परवानग्या घेतल्या नाहीत
शिवसेनेचे नरेंद्र परदेशी यांची प्रशासनाकडे मागणी मी विरोध करीत असून प्रशासन व न्यायालयात दाद मागूनही उपयोग होत नसल्याने आता जनतेत जातीय व धार्मिक तेढ निर्माण करून दंगल घडविण्याचे कारस्थान रचत असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी 10 लाख रूपयांची सुपारी घेतल्याचा आरोपही त्यांनी माझ्यावर केला. या रस्त्यासंदर्भात आपली भूमिका यापुर्वीही मांडली असून हे रस्ते नदीपात्रात व पुररेषेच्या आत असल्याने संबंधीतांच्या परवानग्या घेतलेल्या नाहीत. हे सत्य आहे. या रस्त्यात खाजगी, सरकारी, धार्मिक स्थळे, स्मशानभूमी, सार्वजनीक शौचालये आदी काढण्यात आले आहेत. या घटनेमुळे धुळ्यातील राजकीय हाडवैर पुनःश्‍च सिद्ध होते आहे.