आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बोदवड येथे पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन संपन्न

बोदवड येथे जलजिवन मिशन अंतर्गत ४९.२५ तर गावातील विकास कामांसाठी ५०लक्ष 

मुक्ताईनगर प्रतिनिधि !

तालुक्यातील बोदवड येथे ४९.२५ लक्ष रूपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा दि. ८ सप्टे.रोजी मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडला .

मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड येथे पाण्याची समस्या लक्ष्यात घेता गावातील शिवसेना पदाधिकारी यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कडे आमच्या गावातील पाणी टंचाईची समस्या मिटवा अशी मागणी केली होती लगेच आमदार पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत या योजनेत बोदवड गावाचा समावेश करून योजना ४९.२५ लक्ष रूपयांच्या योजनेस मंजूरीस आणत आज प्रत्यक्षात कामाचे भूमिपूजन पार पडले असता आणखी गावातील विकास कामांसाठी ५० लक्ष रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले

त्यावेळी आमदार चंद्रकांत पाटील ,शिंदे गट शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई,आत्मा समिती अध्यक्ष महेंद्र मोंढाळे, उप तालुका प्रमुख नवनीत पाटील,पंकज पांडव यांनी आपले मनोगत व्यक्त केले .

त्यावेळी आमदार चंद्रकांत पाटील विधान सभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील,गोपाळ सोनवणे, उप तालुका प्रमुख शिवाजी पाटील,शेषराव कांडेलकर,गट प्रमुख विनोद पाटील,किशोर पाटील,जावेद खान,सरपंच इच्छापूर गणेश थेटे,राजू शर्मा,अविनाश वाढे,न्यानेश्वर तायडे, आनंद वानखेडे,अनिल राठोड,राजेश ढोले,योगेश मुळक,शेख फारुक, बाबू भाई,आत्माराम पाटील,सुधाकर पाटील,रतन खवले,दशरथ तलवारे,रमेश कांडेलकर,गणेश सोनवणे,विष्णू पाटील,वैभव पाटील,सुरेश इंगळे, कडू दुरंधर,संजय पुरकर,यांच्या सह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिवसेना सोशल मीडिया सेलचे तालुका प्रमुख दीपक वाघ यांनी केले.