आ.जगतापांचे आव्हान शुभशकूनच!

0

पिंपरी-चिंचवड । भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप रांनी स्वतःचा इतिहास तपासूनच दुसऱ्यावर टीका करावी. ते अवघी तीन वर्षे भाजपमध्ये आहेत, मात्र संपूर्ण राज्यातील, केंद्रातील सत्ता जणूकाही स्वत:च आणल्याचा आव आणून ऊर बडवत आहेत, अशी जोरदार टीका मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. तसेच जनतेतील माझी प्रतिमा व लोकभेतील कामाचा चढता आलेख पाहून जगताप आत्ताच धास्तावले आहेत. यातूनच त्यांनी कोणतेही कारण नसताचा 2019 सालातील लोकसभा निवडणुकीसाठी मला आव्हान दिले आहे. त्यांचे हे आव्हान माझ्यासाठी शुभशकूनच आहे, असे जोरदार प्रत्युत्तरही खा. बारणे यांनी दिले आहे.

खा. बारणे यांनी पत्रकात म्हटले आहे, की माझा प्रचंड जनसंपर्क, सुखदु:खांमध्ये धावून जाणारी प्रतिमा आणि अन्यायाविरुद्धचा लढाऊपणा, तसेच लोकसभेतील कामाचा चढता आलेख पाहून सर्वसामान्र जनता माझ्याशी जोडली आहे. म्हणूनच माझी धास्ती घेवून अजून सव्वावर्षे दूर असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आ. जगताप उसने अवसान आणून आव्हान देऊ लागले आहेत. बारणे उमेदवार असतील, तरच मी लोकसभा लढणार असे आव्हान यांनी 2014 च्या निवडणुकीपूर्वी दिले होते आणि मोठ्या मताधिक्याने मी विजयी झालो. आता 2019 साठी त्यांनी दिलेले आव्हान हे माझ्यासाठी शुभशकूनच ठरेल, असा टोलाही खा. बारणे यांनी हाणला.

शिवसेना पक्षाच्या अंतर्गत संवादाबाबत बोलण्याचा अधिकार जगतापांना नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मातोश्रीच्या पारऱ्या झिजवणाऱ्या जगतापांना शिवसेना नेत्यांनी थारा दिला नाही, याचेच भान ठेवावे. समाजवादी काँग्रेस (एस. काँ.) पक्षातून राजकीर प्रवास सुरु केलेल्या जगताप रांनी आतापर्यंत कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, मनसेचा पाठिंबा, पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस, मोदी लाटेत भाजपा असा प्रवास केला आहे. अशा माणसाने मला पक्षनिष्ठा शिकवावी? आ. जगताप तुमचे तुम्ही आत्मपरीक्षण करा, असा टोलाही खा. बारणे यांनी मारला.

खा. बारणे म्हणाले, माझे लोकसभेतील व मतदारसंघातील काम मावळची जनता पाहते आहे. मला तुमच्या सर्टीफिकेटची गरज नाही, कोणत्राही चांगल्या लोकप्रतिनिधीच्या मागे जनता जनार्दन असते, त्या लोकप्रतिनिधीचा स्वभाव त्याचे वागणे बोलणे त्याची काम करण्याची पद्धत यामुळे तो यशस्वी होतो. मी स्वतः गेली अनेक वर्षात केलेल्या कामातून तर वेळप्रसंगी केलेल्या संघर्षातून इथपर्यत पोहचलो असल्याने माझी बांधिलकी जनतेशी आहे. त्यामुळे अशा व्यक्तिगत टीकेला मी भीक घालत नाही. मावळ लोकसभेच्या आम जनतेच्या आशीर्वादावर मी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेत पुन्हा जाणार आहे, याला कोणत्राही फालतू आव्हानाची गरज नाही. माझ्या विरोधात काढलेले पत्रक म्हणजे लक्ष्मण जगतापांचा बालिशपणा, सत्तेची व पैशाची मस्ती आहे हे पुन्हा एकदा उघड झाले आहे, असेही खा. बारणे यांनी या पत्रकात म्हटले आहे.

खा.बारणे-आ.गोर्‍हे वादात जगतापांची उडी
शिवसेने सोमवारी ‘मातोश्री’वर मंत्री, खासदार व आमदारांची बैठक आयोजित केली होती. याबैठकीत आमदार नीलम गोर्‍हे व बारणे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. भाजपकडून लोकसभा लढवावी, असे लक्ष्मण जगताप यांना गोर्‍हे यांनी सूचविल्याचा आरोप बारणे यांनी केला होता. याच वादात उडी ठोकत जगताप यांनी मंगळवारी एक पत्रक काढून बारणे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. ‘बारणे यांना कामाच्या जोरावर नव्हे, तर मोदी लाटेमुळे खासदारकी मिळाली असा आरोप करत हिंमत असले तर त्यांनी शिवसेनेकडूनच लोकसभा लढवून दाखवावी’, असे खुले आव्हानही पत्रकाव्दारे दिले होते. या पार्श्‍वभूमीवर बारणे यांनीही बुधवारी पत्रक प्रसिद्धीस देवून प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपमुळे अंगावर मांस चढले
आ. जगतापांनी स्वतःचा इतिहास तपासूनच दुसर्‍रावर टीका करावी. लोकप्रतिनिधी जनतेच्या पाठिंब्यावर विजरी होतो. ‘भाजप’मुळे मुठभर मांस अंगावर चढल्रामुळेच कोणतेही कारण नसतांना ते वल्गना करू लागले आहेत. तीन वर्षापेक्षा कमी काळ ‘भाजप’मध्ये दाखल झालेले आ. जगताप संपूर्ण राज्यातील, केंद्रातील व स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्ता जणूकाही स्वत:च आणल्याचा आव आणून ऊर बडवू लागले आहेत.

विधानसभेत किती वेळा तोंड उघडलेत?
मी भाजप-शिवसेना युतीतील खासदार आहे हे विसरलेलो नाही. परंतु 2014 च्रा लोकसभा निवडणुकीचा कालावधी आ. जगताप विसरले आहे. 2014 ची लोकसभा माझ्याविरोधात लढण्यापूर्वी जगतापांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचे नाटक केले. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून गठ्ठा मतावर डोळा ठेऊन शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करून त्या पक्षाची अधिकृत उमेदवारी घेतली.

साथीला ‘मनसे’चाही पाठिंबा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व फौजबरोबर घेतली तरीदेखील यांना पावणेदोन लाखांनी पराभव पत्करावा लागला होता, हे ते विसरले काय? तसेच मरेपर्यंत शेतकरी कामगार पक्ष सोडणार नाही, अशा घेतलेल्या शपथेचेही विस्मरण झाले? पराभवानंतर जगताप पुन्हा राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल झाले.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत परत पराभव दिसू लागल्याने ते ‘भाजप’वासी होवून मोदी लाटेत निवडून आले. जगताप रांनी स्वतःच्या कामाचे आत्मपरीक्षण करून टीका करावी. माझ्या तीन वर्षाच्या लोकसभेतील कामकाजाचा लेखाजोखा केंद्र सरकारच्रा संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तो यांनी पाहून घ्यावा. आपण गेली तेरा वर्ष विधानसभेमध्ये किती वेळा तोंड उघडले हे देखील चिंचवडच्या जनतेला सांगावे. तोंड न उघडलेल्या आमदारामध्ये चिंचवडच्या आमदाराची गणना होते ही बाब चिंचवडकरांसाठी लाजिरवाणी आहे, असे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.