जळगाव । सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणार्या आमदार प्रशांत परिचारक यांचं अखेर निलंबन झालं आहे. परिचारक यांना दीड वर्षासाठी निलंबित करण्यात आल्याची घोषणा, सभापती रामराजे निंबाळकर यांनी केल्याने जळगाव येथे युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यानी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला आहे. या वेळी राष्ट्रवादीचे चंदन कोल्हे, योगेश देसले,शेख सहभागी झाले होते .
विरोधकांनी केली होती राजीनाम्याची मागणी
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये प्रशांत परिचारक यांची सभा होती. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसेमध्ये उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत, विरोधकांवर टीका करण्याच्या नादात भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी सीमेवर लढणार्या जवानांचा अपमान त्यांनी केला होता. अधिवेशनात व सभागृहात विरोधकांनी व शिवसेनेनी आमदार परिचारक यांनी केलेल्या व्यक्तव्या वरून मोठा गदारोळ सभागृहात केला होता. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आल्याने सभापती रामराजे निंबाळकर यांनी त्यांना निलंबित केले आहे.