आ.पावरांनी विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार

0

धुळे । शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांच्यावर वर्सावा मुबई येथील एका महिलेने विनयभंग केल्याची तक्रार वर्सावा पोलीस स्टेशनला दिल्याची बातमी 27 रोजी दुपारपासून सोशल मिडीयावर झळकत होती. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. दरम्यान, आमदार यांना विचारणा केली असता, त्यांनी आपले वर्सावा,अंधेरी येथिल घर 3 वर्षापासून एका जोडप्यास भाडे तत्वावर दिले होते. करारानुसार दिड लाख रुपये डीपोझीट ठरले होते.तर 45 हजार रुपये मासिक भाडे होते. दरम्यान भाडेकरू मयेकर कुटुंबीय यांनी डीपोझीट रकमेतून पन्नास हजार दिल्याचे पावरा यांनी म्हटले आहे. तर तब्बल चौदा महिने उलटून देखील भाडेकरूनी भाडे न दिल्यामुळे आमदार पावरा यांनी त्यांना बाहेर निघण्यास सांगितले. परंतु त्या लोकांनी बाहेर निघण्यास नकार दर्शविल्याने पावरा यांनी त्यांना बडजबरी बाहेर काढले. दरम्यान, भाडेकरूनी पोलिसात धाव घेतली असून आमदार पावरा यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार रात्री उशिरा पर्यंत वर्सावा पोलीस पावरा यांच्या अंधेरी येथील घरात थाबुन होते.