चाळीसगाव – येथील आ.बं. मुलांचे हायस्कुलच्या मुख्याध्यापकपदी विद्रोही साहित्यिक तथा खान्देश साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव शंकर मोरे यांची नियुक्ती व्यवस्थापन मंडळाने केली त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र हे सेवाजेष्ठतेनुसार देण्यात आले. साहित्यिक साहेबराव मोरे यांचे साहित्य, समाजकार्य, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. शतकोत्तर शाळेला मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून शाळेला गतवैभव प्राप्त करण्यासाठी आपण शिस्तबद्धरित्या नियोजन करणार आहोत, असे यावेळी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन नारायनभाऊ अग्रवाल, सचिव डॉ. विनोद कोतकर, तसेच संचालक मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.