अमरावती : पोलिसास मारहाण केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांना अचलपूर न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर त्यांना 600 रूपये दंड आकारण्यात आला आहे. 2017 मध्ये चांदूर बाजारामध्ये वाहतूक पोलिस इंद्रजीत चौधरी यांना आमदार बच्चू कडू व कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती.
याप्रकरणी बच्चू कडू यांनी सर्व आरोप फेटाळले होते. पोलिसांच्या हलगर्जीमुळे त्या परिसरात अनेक अपघात झाले आहेत. यासंबंधी फक्त जाब विचारला होता. मात्र, पोलिसांनी याचे उत्तर उद्धट पद्धतीने दिले. त्यावेळी फक्त शाब्दिक वाद झाला, मारहाण केली नाही, असा दावा बच्चू कडू यांनी केला होता. मात्र, याप्रकरणी त्यांना दोषी ठरवत एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती.