आ.रघुवंशींच्या हस्ते शेतकर्‍यांना पीककर्ज धनादेश वाटप

0

नंदुरबार। धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेतर्फे सन 2017-18 च्या खरीप हंगामासाठी पिककर्ज वाटपाचा कार्यक्रम जिल्हा बॅँकेचे संचालक आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झाला. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे संचालक विक्रमसिंग वळवी, जिल्हा परिषद बांधकाम सभापती दत्तु चौरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सयाजीराव मोरे, शेतकरी संघाचे चेअरमन बी.के.पाटील आदी उपस्थित होते.

शेतकर्‍यांना दिले धनादेश आणि रुपे कार्ड
जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेच्या नंदुरबार विभागतर्फे आयोजित कार्यक्रमात शंभर टक्के पीककर्जाची वसुली करणार्या गुजरजांभाली वि.का.सह.सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन व सचिव यांचा सत्कार आ.रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुजरजांभोली येथील शेतकर्‍यांना पीककर्जाचे धनादेश आणि रुपे कार्डचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, न.पा.बांधकाम सभापती निखिल रघुवंशी, राजाभाई पटेल तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन खोंडामळी वि.का.सह.सोसायटीचे सचिव राजेंद्र पाटील यांनी केले. तर आभार जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी डी.बी.पवार यांनी मानले.