सिंधुदुर्ग – आमदार नितेश राणे सिंधुदुर्गातील मत्स्य विभागाच्या कार्यालयात जात तेथील सहाय्यक मत्स्य आयुक्त वन्स यांच्याशी बाचाबाची झाल्यानंतर त्यांच्या अंगावर मासे फेकले होते. या प्रकरणी राणेंवर एफआयआर दाखल झाला आहे. दरम्यान, मासा फेकून मारल्याचा पश्चाताप नाही, मच्छीमारांसाठी हसत हसत तुरुंगात जायला तयार असल्याचे राणे म्हणाले.