प्रभाग १९ अ मध्ये होणार पोटनिवडणूक
जळगाव- प्रभाग क्रमांक 19 अ च्या शिवसेनेच्या नगरसेविका आ.लताताई सोनवणे यांनी मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांच्याकडे नगरसेविकापदाचा राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.त्यामुळे या रिक्त जागसाठी पोटनिवडणूक होणार आहे.दरम्यान,पोटनिवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
मनपा निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 अ मध्ये शिवसेनेच्या लताताई सोनवणे निवडून आल्या आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चोपडा विधानसभा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या आहेत. त्यामुळे आ.लताताई सोनवणे यांनी लोकप्रतिनिधी कायद्यानुसार मनपा नगरसेविकापदाचा राजीनामा दिला असून मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. दरम्यान,पोटनिवडणुकीसाठी मनपा प्रशासनाच्यावतीने राज्य निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.