अमळनेर। हिरा उद्योग समुहाच्या आर्थिक योगदानातून नगरपरिषदेला एक शववाहिनी उपलब्ध करु देण्यात आलेली असतांना अजून एका शववाहिणीची गरज भासत असल्याचे लक्षात घेऊन आमदार शिरीष चौधरी यांनी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत एक शववाहिनी नगरपरिषदेला भेट दिली आहे. शववाहिणीसाठी 7 लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे पत्र जिल्हा नियोजन समितीकडून अमळनेर नगरपरीषदेला प्राप्त झाले असल्याची माहिती आमदार शिरिष चौधरी मित्रपरिवार आघाडीचे गटनेते प्रविण पाठक यांनी दिली.
नगरपालिकेकडे दोन शववाहिणी असणार
अमळनेर शहरात माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व. सुरेश ललवाणी यांनी नगरपरिषदेला शववाहिणी उपलब्ध करून दिल्याने व सोबत देखरेखसंबंधीची जवाबदारी स्वीकारल्याने अनेक वर्षे या शववाहिणीने सेवा दिली. आमदार चौधरी यांनी आर्थिक वर्षाकरीता अमळनेर नगर पालिकेस शववाहिनी देण्याची शिफारस केली होती. यासाठी मुख्याधिकार्यांनी 6 लाख 85 हजार 640 लक्ष किमतीचा प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसह प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केला होता. जनतेच्या सोयीसाठी लवकरात लवकर शववाहिणी उपलब्ध करावी अशी अपेक्षा प्रविण पाठक यांनी व्यक्त केली आहे.