अहमदनगर । अहमदनगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नगरमध्ये भारनियमनविरोधात आंदोलन केले. त्यावेळी पोलिसांनी आमदार जगताप यांना ताब्यात घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसने तीन दिवसांपूर्वी आंदोलन केल्यानंतर, महावितरण अधिकार्यांनी गुरुवारपासून भारनियमन बंद होईल असें लेखी आश्वासन दिलें होते. मात्र महावितरणने काल संध्याकाळी भारनियमनचे नवीन वेळापत्रक जारी करत, भारनियमन चालूच राहणार असल्याचे सांगितलें. त्यामुळे राष्ट्रवादीने महावितरण कार्यालयात आंदोलन केले.